"अखेरीस… 'Ee Sala Cup Namde' 🏆 झाल.! RCB अखेर चॅम्पियन-१८ वर्षांची प्रतीक्षा संपली!"
"अखेरीस… १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, लाखो चाहत्यांच्या धडकत्या हृदयांमध्ये जागा असलेली टीम – 'RCB' – चॅम्पियन झाली!
हा फक्त एक विजय नाही, ही एका स्वप्नाची पूर्णता आहे… जी स्वप्न RCBच्या चाहत्यांनी दरवर्षी पाहिली, दरवेळी नव्या आशेने जीव तोडून पाठिंबा दिला, आणि दर वेळेस हळहळत परतले…
पण यावेळी नाही! यावेळी मैदानात फक्त एक टीम खेळत नव्हती – मैदानात विराटचा संयम, अनुभव, राग, आणि चाहत्यांचा आक्रोश खेळत होता.
विराटने जे सहन केलं… ट्रॉफी नाही म्हणून झालेले ट्रोल्स, टीका, अपमान… पण तो ढिम्म हलला नाही.
आणि आज, अखेर त्याच्या हातात तो 'कप' आहे – जो तो इतके दिवस न्यायासारखा मागत होता.
RCB ची ही जिंकलेली ट्रॉफी म्हणजे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक आहे – कारण ती फक्त एका टीमची नाही, ती संपूर्ण भारताची आहे!
कारण RCB चा हेटर आता उरलेलाच नाही... विराटच्या अश्रूंनी प्रत्येक हृदय
"RCB ने चा कप जिंकलाय! आता आमचं आयुष्य पूर्ण झालं... पुढे काही मिळालं नाही तरी चालेल!
१८ वर्षं आम्ही फक्त हसून सहन केलं –
'Ee Sala Cup Namde' चे memes,
'RCB = Royal Chokers Bangalore' ची टवाळी,
आणि दर IPL नंतर आमचा चेहरा 'sad emoji' सारखा होत होता.
पण आता आम्ही 'स्माईली विथ गॉगल्स' झालोय!
म्हणजे सांगतो – आमच्याकडे ट्रॉफी आलीय!!!
आज आमचे CSK आणि MI वाले मित्र सुद्धा आमचं अभिनंदन करतायत –
कारण RCB चा विजय म्हणजे संपूर्ण भारताचं स्वप्न पूर्ण होणं!
फार फरक नाही की तू कोणता फॅन आहेस.
RCB चं हे यश म्हणजे 'slow cooker' मध्ये बनवलेलं बिर्याणी आहे – वेळ लागला… पण चव भन्नाट आहे!! 😍🔥"
-एक RCB Fan 😎✌️
Comments
Post a Comment