हॉलीवूड चे चित्रपट पाहण्याचे फायदे..!

हॉलीवूड चे चित्रपट पाहण्याचे फायदे..!

मित्रांनो, हॉलिवूड चे चित्रपट का पाहावेत?

आपल्या कडे असे बरेच लोक आहेत त्यांना हॉलीवूड चे चित्रपट आवडत नाहीत, किंबहुना त्यांना भारता बाहेरचे सिनेमे बघायला आवडत नाहीत. काही वर्षांपूर्वी तर लोक तर हॉलीवूड चे सिनेमे बघणे म्हणजे वाईट सवय आहे असं म्हणायचे. अजून ही अशीच परिस्थिती आहे , बरेच लोक हे सिनेमे पाहणे टाळतात त्याच्या मनामध्ये ह्या चित्रपटाबद्दल नूनगंड आहे . याला तीन गोष्टी कारणीभूत असाव्यात, पहिली म्हणजे हॉलिवूड चे चित्रपट अश्लील असतात, दुसरी त्यांची कल्पनाशक्ती आपल्या प्रेक्षकांना समजत नाहीत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपले प्रेक्षक हिंदी चित्रपट सोडून दुसरा विचारच करू शकत नाहीत.


 मित्रांनो , भारताबाहेरचे सिनेमे म्हणजे अश्लील अस काही नसते, ते त्या त्या देशाची राहणीमान ,संस्कृती असते आणि त्यांना ते त्या व्यक्तिरेखेसाठी त्या प्रकारे दाखवावे लागते. महत्त्वाचे म्हणजे ह्या हॉलिवूडच्या सिनेमा मधून खूप काही शिकण्यासारख असते.आणि आज ह्या बद्दलच चर्चा करणार आहोत. आपल्या पैकी बरेच असे असतील ते हॉलिवूड चे सिनेमे पाहत नसतील आणि आपल्या मुलांना पण बघून देत नसतील, तर हा लेख त्याच्या साठीच आहे.


तर पाहूया हॉलिवूड चित्रपट पाहण्याचे फायदे-

 इंग्लिश भाषा - सर्वात महत्त्वाचे गोष्ट अशी की, हॉलिवूड च्या सिनेमे पहिल्या मुळे इंग्लिश भाषा सुधारते.  तुम्हाला माहीतच आहे की इंग्लिश ही जागतिक दर्जाची भाषा आहे, आणि ती आताच्या काळात शिकणे किती महत्त्वाचे आहे ते.


जगाची ओळख- ह्या चित्रपटामुळे जगात कोण कोणते देश आहेत त्यांची भाषा,  संस्कृती, राहिणीमान, खाद्यपदार्थ ,परंपरा, सण, खेळ आणि तेथील लोक कशे आहेत हे समजते . त्यामुळे तुम्हाला  जगाची ओळख होते तेही देशांच्या बाहेर न जाता.


भविष्यातील जगाची ओळख- त्यांनी ह्या  चित्रपटामध्ये ते भविष्यात जग कसं असू शकते हे दाखवले आहे आणि ते बऱ्याच वेळी खरं ठरलेलं आहे उदा. मोबाइलला, बोलणारे रोबोट , आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रे इत्यादी. हे चित्रपट बघून तुम्ही काहीतर चांगलं बनवू शकाल त्याचा व्यवसाय करू शकता.

अफाट कल्पनाशक्ती- हॉलिवूडचे खासियत म्हणजे त्याचे काल्पनिक चित्रपट त्याचा हात ह्या मध्ये कोणीच धरूच शकत नाही. काल्पनिक सिनेमा कसा पाहिजे? खूपच रोमांचक पाहिजे, बघतांना अंगावर शहारे आले पाहिजे, जे आपण खऱ्या आयुष्यात करु किंवा पाहू शकत नाही.  ह्या सिनेमा मध्ये अश्या गोष्टी बघायला भेटतात ज्या तुम्ही खऱ्या आयुष्यात बघितल्या नसणार . ह्या चित्रपटचे अकॅशन सीन खूपच छान आणि रोमांचक असतात, तुमच्या अंगावर नकीच शहारे येतील. उदा. गुप्तचर यंत्रणा त्यांचे लोक, रोबोट, हजारो वर्षेपूर्वी चे  डॉयनासोर ,परग्रहवासी लोक आणि प्राणी , भविष्यातील मनुष्य त्याचं जीवन त्याचे युद्ध हे सर्व गोष्टी अनुभवता येतील. उदा. जुरासिक पार्क, टर्मिनेटर , alians, जेम्स बॉण्ड, आवेनजर्स, सुपरमॅन हे सिनेमे इत्यादि.असे अजून बरेच आहेत , त्यावर आपण पुढच्या लेखामध्ये चर्चा करू.


व्यवसाय, खेळ आणि माहिती- ह्या सिनेमा मध्ये बऱ्याच गोष्टी अश्या आहेत त्या बघून तुम्हीला काहीतर व्यवसाय ची कल्पना येईल किंवा काहीतर व्यवसाय सुरू कराल . काहीतर माहिती भेटेल, भाषा, कला आणि खेळ शिकाल ज्या की भारतात पहावयास भेटत नाहीत . तुम्ही जर नवीन काही पहिलच नाही ऐकलेच नाही तर तुम्हाला नवीन काही कळणारच कसे?तर मित्रहो नवीन गोष्टी बघा ,वाचा आणि शिका , आणि आपल आयुष्य समृद्ध करा..!


- अजय पवार



Comments

Popular posts from this blog

"अखेरीस… 'Ee Sala Cup Namde' 🏆 झाल.! RCB अखेर चॅम्पियन-१८ वर्षांची प्रतीक्षा संपली!"

हा हिरव्या रंगाचा पहिलवान(Hulk) आहे तरी कोण??